बुरूंडीत जॉगिंग करणार्‍यांना होते जन्मठेप

burundi
आफ्रिकेतील बुरूंडी या देशात जॉगिंग करणे हा गुन्हा ठरविला गेला असून जॉगिंग वर येथे बंदी घातली गेली आहे. हा नियम मोडून जॉगिंग करणार्‍यांना येथे जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. ऐकायला विचित्र वाटणारा हा प्रकार बुरूंडीचे राष्ट्राध्यक्ष पियरे नकरूंजिजा याना वाटणार्‍या भीतीपोटी कायदा स्वरूपात वैध ठरविला गेला आहे.

वास्तविक बुरूंडीच्या घटनेप्रमाणे कोणताही अध्यक्ष दोन वेळाच अध्यक्षपद भूषवू शकतो. पियरे यांच्या दोन्ही टर्म पूर्ण होत आल्या आहेत मात्र तरीही तिसर्‍यांदा आपणच अध्यक्ष बनणार याची त्यांना खात्री आहे. पियरे यांनी केलेल्या नव्या कायद्यांमुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी जॉगिंग करण्यावरची बंदी हा असाच त्रासदायक कायदा. अर्थात खासगी परिसरात मात्र जॉगिंग करण्यावर बंधने नाहीत. जॉगिंग वर बंदी आणण्यामागे पियरे यांना वाटत असलेली भीती कारणीभूत आहे असे समजते. जॉगिंग करण्यासाठी नागरिक एकत्र येतात व तेव्हा ते एकत्र येऊन आपल्याविरोधात कांही कट रचतील, सरकारविरोधात कांही योजना बनवितील आणि आंदोलने करतील अशी भीती पियरे यांना सतावत असते. त्यामुळे ही बंदी आणली गेली आहे.

आजही अनेक लोक जॉगिंग केल्याच्या आरोपावरून तुरूंगात डांबले गेले आहेत. हे सर्व लोक विरोधी पक्षाचे असून त्यांनी एकता व लोकतंत्र आंदोलन छेडले होते असेही समजते.

Leave a Comment