बनारस साड्यांना गतवैभव प्राप्त होणार

banarasi
बनारस- जगभरात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या बनारसी साड्या आणि भदोही कार्पेट व्यवसायाला पुनर्जिवित करण्यासाठी केंद्रीय कुटीरोद्योग मंत्री कलराज मंत्री यांनी योजना तयार केली असून त्याची अम्मलबजावणी युद्धपातळीवर केली जाणार आहे असे समजते. पंतप्रधान मोदीं ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्या भारतातील जुन्या शहरात म्हणजे वाराणसीत जपली गेलेली पारंपारिक विणकर प्रथा आज मरणोत्मुख अवस्थेत आहे. आणि येथील विणकरांनी साड्यांना मागणी कमी झाल्यामुळे अन्य व्यवसायांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

मोठी यंत्रे आणि यांत्रिकीकरणामुळे येथील हातमाग व्यवसाय अगोदरच अडचणीत आला होता. त्यातच या खास साड्यांसाठी लागणारा कच्चा माल महाग झाला आहे. माजी सरकारने चीनमधून मागविण्यात येणार्‍या रेशमावरील आयातकर पाच टक्कयांवरून २० टकक्यांवर नेल्याने विणकरांना मिळणारा नफा खूपच कमी झाला असल्याने हा हातमाग उद्योग अडचणीत सापडला आहे. या साड्यांसाठी लागणारया एकूण रेशमातील ८० टक्के रेशीम चीनमधून येते तर बाकी २० टक्के कर्नाटकातून आणले जाते. त्यातच भ्रष्टाचाराचा बुजबुजाट असल्याने विणकारांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. या विणकरांच्या सुमारे ६०० सोसायट्या आहेत मात्र त्यातील निम्म्या सोसायट्यांचेच व्यवहार पारदर्शी आहेत. या व्यवसायात आत्तापर्यंत ६ ते ८ लाख विणकर होते मात्र व्यवसायावर उदरनिर्वाह करणे कठीण झाल्यामुळे त्यांनी अन्य व्यवसाय स्वीकारले आहेत.

केंद्र सरकारने हा पारंपारिक उद्योग जतन करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने कांही महत्त्वाच्या योजना आखल्या आहेत. या योजनांमुळे या व्यवसायाला गतवैभव प्राप्त होईल आणि पुन्हा एकदा बनारसी साडी जगभरात नांव मिळवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment