पॅकबंद खाद्यपदार्थांची गुणवत्ता सांगणारे फुडूकेट अॅप

fooducate
आजकाल मोठमोठ्या मॉलपासून ते किरकोळ किराणा दुकानांपर्यंत सगळीकडे पॅकबंद खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध असतात. मात्र हे खाद्यपदार्थ नक्की किती सुरक्षित आहेत याची माहिती ग्राहकाला मिळू शकतेच असे नाही. बारकोडचा वापर केल्या जाणार्‍या दोन लाखांहून अधिक खाद्यपदार्थांची पोषणमूल्ये आणि गुणवत्ता ओळखणारे फूडुकेट हे अॅप आता ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हे अॅप खाद्यपदार्थाचे पॅक स्कॅन करते आणि त्यातील पोषणमूल्यांची पूर्ण माहिती देते. त्यासाठी ए,बी, सी, डी अशा ग्रेड देते आणि त्या रेटिगनुसार हेल्थ फॉर्म्युला तयार करते. विशेष म्हणजे सर्वसाधारणपणे ग्राहक पॅकबंद खाद्यपदार्थ घेताना ज्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्या म्हणजे पदार्थातील प्रिझर्व्हटिव्हचे प्रमाण, वापरले गेलेले रंग, कॉर्न सीरपचे प्रमाण, अन्य मिसळले गेलेले पदार्थ, रसायने, साखर, आणि पदार्थाचे खरे आकारमान यासंबंधीची माहिती पुरविते. युजर याचा डेटाबेस तयार करून तो अन्य युजरबरोबर शेअरही करू शकतो. हे अॅप अँड्राईड व आयफोन युजरसाठी मोफत उपलब्ध करून दिले गेले आहे.

Leave a Comment