नेदरलँड्सने केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

fifa3

पोर्तो अॅलेग्री – फुटबॉल वर्ल्ड कपमधील शेवटपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत नेदरलँड्सने ३-२ ने विजय मिळवीत ऑस्ट्रेललियाला धूळ चारली. या स्पर्धेत नेदरलँड्सने सलग दुस-या विजयाची नोंद करीत बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे. वर्ल्ड कप विजेत्या स्पेनला पराभवाचा धक्का देणारी नेदरलँड्स टीम पराभूत होते की काय अशी परिस्थिती मॅच दरम्यान निर्माण झाली होती. दरम्यान अनुभवाच्या जोरावर नेदरलँड्नसे विजय खेचून आणला.

अर्जेन रोब्बेनेने २०व्या मिनिटाला पहिला गोल करत नेदरलँड्सचे खाते उघडले. यानंतर लगेचच २१ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या टिम काहिलीने गोल करत बरोबरी साधली. यानंतर मिले जेदिनाकने ५४ व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रेलियाला २-१ ने आघाडी मिळवून दिली. नेदरलँड्सचा महत्त्वाचा प्लेअर रोबिन वॅन पर्सीने ५८ व्या मिनिटाला गोल करत नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली तर ६८व्या मिनिटाला मेम्फिस डीपे गोल करत ३-२ने विजयी आघाडी मिळवून दिली.

अर्जेन रॉबेन आणि रॉबिन वॅन पर्सी यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर नेदरलँड्सने फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. हॉलंडने ऑस्ट्रेलियावर ३-२ अशी मात करून बाद फेरी गाठली. या लढतीत रॉबेन आणि पर्सी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. आतापर्यंत रॉबेनने २१ सामन्यांत गोल नोंदविले असून, त्यामध्ये नेदरलँड्सने अपराजित होते. त्यातील १८ सामने हॉलंडने जिंकले, तर तीन सामने बरोबरीत सुटले. पुन्हा एकदा रॉबेन संघासाठी लकी ठरला.

Leave a Comment