चाईल्ड पोर्नोग्राफीवर जपानमध्ये कायद्याने बंदी

japan
टोकियो – अन्य विकसित देशांप्रमाणेच चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी आणणारा कायदा जपानच्या संसदेत नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या पुढे जपानमध्ये चाईल्ड पोनेार्ग्राफी फिल्म तयार करणे व त्याचे वितरण करणे बेकायदा असून कायदा मोडणार्‍यांना १ वर्षाची कैद आणि १० दशलक्ष येन दंड अशी कारवाई होऊ शकणार आहे. चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी आणावी यासाठी जपानमध्ये दीर्घकाळ आंदोलन सुरू होते.

नवीन कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलांचे अश्लील फोटो, व्हिडीओ चित्रिकरण करणे आणि ते वितरीत करणे गुन्हा ठरणार आहे. या वयोगयातील मुलांचे ड्राईंग ग्राफिक्सही करणे बेकायदा ठरविले गेले आहे. मात्र संगणकावर तयार करण्यात आलेल्या मैंगा कॉमिक्स व एनीमे व्हिडीओसाठी मात्र ही बंदी लागू नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणून या दोन्हीवर बंदी घातली गेली नाही असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे विकसित देशांच्या जी ७ समुदायातला जपान हा एकमेवच देश असा होता की जेथे चाईल्ड पोर्नोग्राफी कायदेशीर होती. आता मात्र त्यावर बंदी आणून जपान जगातील ७० देशांत समाविष्ट झाला आहे.

Leave a Comment