इंग्लंडपुढे उरुग्वेचे आव्हान

fifa

साओ पावलो : फिफा विश्वचषकाच्या ड गटात आज इंग्लंड आणि उरुग्वे या संघांत लढत रंगणार आहे. हा सामना इंग्लंड आणि उरुग्वे या संघांसाठी ‘करा अथवा मरा’ असाच होणार आहे. सुरुवातीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने या दोन्हीत संघासाठी ही लढत प्रतिष्ठिची ठरणार आहे. या सामन्यात ख-या अ‍र्थाने इंग्लंडपुढे उरुग्वे संघाचे आव्हान असणार आहे. हे आव्हान ते कशा प्रकारे पेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीच इंग्लंड संघाला सलामीच्या लढतीत इटली आणि उरुग्वेला कोस्टारिकाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या दोन्ही संघांना कोणतीही चूक महागात पडणार आहे. या लढतीत झालेला पराभव हा राज हॉजसन यांचा इंग्लंड किंवा दोन वेळेसचा चॅम्पियन उरुग्वेला स्पर्धेबाहेर फेकू शकतो. उरुग्वेने पहिली लढत १-३ फरकाने गमावली होती. उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेज हा गुडघेदुखीच्या शस्त्रक्रियेनंतर सावरला असून तो उद्या खेळू शकतो. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये सुआरेजने ३१ गोल केले होते आणि तो अव्वलस्थानी होता.

या सामन्याीत इंग्लंडसाठी त्यांचा चिंतेचा विषय तो त्यांचा डिफेन्स आहे. सेंटर हाफ गॅरी काहील इटलीविरुद्ध मारियो बालाटेली याला रोखण्यात अपयशी ठरला होता. मारियो बालाटेलीने हेडरद्वारे गोल केला होता.उरुग्वेदेखील आपल्या डिफेन्समुळे चिंतित आहे. कोस्टारिकाच्या स्ट्रायकर अर्सेनलच्या जोएल कॅम्पबेल आणि पीएसपी एंडहोवेनचा ब्रायन रुईजने त्यांना सातत्याने अडचणीत आणले होते. याशिवाय संघाला बेनफिकाचा डिफेंडर मॅक्सी परेराचीदेखील उणीव भासेल. इंग्लंडला एडिन्सन कवानी आणि सुआरेज या स्ट्रायकर जोडीवर लक्ष ठेवावे लागेल. यापूर्वी दोन्ही संघा दरम्यान झालेल्या लढतीत उरुग्वेने चार आणि इंग्लंडने तीन सामने जिंकले आहेत

Leave a Comment