‘अमेझॉन’चा अमेझिंग थ्रीडी स्मार्टफोन!

amazon
वॉशिंग्टन – ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट म्हणून ‘अमेझॉन’ला ओळखले जाते. याच कंपनीने जगातील सर्वात पहिला थ्री डी डिस्प्ले स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

अमेरिकेत बुधवारी ह्या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात आले असून, 25 जूनपासून या फोनची शिपिंग सुरू होऊन तो ग्राहकांपर्यंत पोहचेल.

या फोनमध्ये उल्लेखनीय फिचर्स असून तुम्ही हा स्मार्टफोन तुम्हाला हवा त्या दिशेने फिरवून तुम्हाला हव्या त्या अँगलनं फोटो काढू शकता. हा कॅमेरा प्रत्येक सेकंदाला 60 इमेजेस तयार करू शकतो. यासाठी या फोनमध्ये चार फ्रंट-फेसिंग कॅमेरे बसवण्यात आले आहे. यातील दोन कॅमेऱ्यांवर तुम्ही बोट ठेऊन तुमच्या चेहऱ्यासमोर फिरवला तरीही तुम्हाला तुमचे डोके कुठे आहे हा फोन दाखवून देऊ शकतो.

Leave a Comment