झ्युरिक/नवी दिल्ली- स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती बँकेने भारतीयांकडून स्वीस बँकेत जमा झालेल्या ठेवीमध्ये तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती दिली आहे. ही रक्कम जवळ जवळ १४ हजार कोटी इतकी असल्याचे बँकेने म्हटले आहे.
स्वीस बँकांतील भारतीयांच्या ठेवी ४० टक्क्यांनी वाढल्या
स्वित्झर्लंडमधील असलेल्या बँकांमध्ये २०१३मध्ये भारतीयांकडून ठेवण्यात आलेल्या ठेवी ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे देशातील मध्यवर्ती स्वीस नॅशनल बँक(एसएनबी)च्या ताज्या आकडेवारी म्हटले आहे.
भारतीयांच्या ठेवींमध्ये वाढ झाली असली तरी जगातील अन्य देशातील खातेदारांचा विचार केल्यास स्वीस बँकांमधील एकूण ठेवींमध्ये घट झाल्याचे ‘एसएनबी’ म्हटले आहे. ठेवींचे प्रमाण २०१३च्या आर्थिक वर्षाअखेर ९० लाख कोटींनी कमी झाल्याचे बँकेने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.
भारतासह जगभरातील अनेक देशांकडून स्वीस बँकांमध्ये असलेल्या ठेवींची माहिती मागवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. अशा वेळी एसएनबीने ही आकडेवारी प्रसिद्ध केल्यामुळे स्वीस बँकांमधील पैसा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.