मुंबई – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने सेनेच्या आशा उंचावल्या आहे तर’ भोपळा’ पदरात पडल्याने अस्तित्वासाठी मुख्यमंत्रीपद हस्तगत करण्यासाठी थेट विधानसभा निवडणूक लढविण्याची गर्जना करणाऱ्या मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनी ‘सीएम’ पदासाठी जोरदार हालचाली चालविल्या आहेत, पण त्यांचा नामोल्लेख टाळत एकेकाळी सहकारी असलेल्या आणि आता राष्ट्रवादीचे नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं रंगवणाऱ्या सगळ्यांनाच शुभेच्छा दिल्या आहेत.
‘सीएम’ची स्वप्ने पाहणाऱ्याना छगन भुजबळांच्या शुभेच्छा
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेने भाजपची सत्ता देशात आली ,त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘मोदी फॉर्म्युला’ महत्वाचा ठरला आहे. परिणामी स्वतःहून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याच्या हालचाली सेनाच काय मनसेच्या नेतृत्वाकडून जोरात सुरु झाल्या आहेत. त्यात भाजपमध्येही मुख्यमंत्रीपदासाठी ‘आवाज’ दिला जात आहे.
या पार्श्वभूमीवर भुजबळ यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी अत्यंत खोचक शब्दात आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या सगळ्यांनाच माझ्या शुभेच्छा अशा शब्दात राज आणि उद्धव यांना टोमणा हाणला आहे.