विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेनेचा जाहीरनामा

shivsena1
मुंबई : विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेनेने जाहीरनामा घोषित करून विकासाचे सूत्र काय आहे हे जनतेपुढे मांडण्याची तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांमध्ये वाटण्यात आलेल्या पुस्तिकेत विधानसभेच्या निवडणूकीचा जाहीरनामा घोषित करण्यात आला आहे.

सेनेच्या या पुस्तिकेतून कॅम्पा कोलासारख्या इमारतींना संरक्षण देण्यासाठी नियमात बदल करण्याची घोषणा करण्यात आली असून राज्यात स्वस्त घरांच्या योजना राबवणे, ग्रामीण भागात स्वच्छ पाणी, आरोग्याच्या सोयी पुरवण्यावर भर देण्यात आला आहे.त्याचबरोबर सीआरझेडच्या नियमात बदल करण्याचे सुतोवाचही या करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातले पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी शिवसेना सत्तेत आल्यास प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या या मेळाव्यातून शिवसेनेने आपला विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment