वारीसाठी वारक-यांना टोलमाफ

toll
मुंबई- महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा पंढरपूरची वारी हा आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी या वारीला जाणा-या सर्व गाड्यांसाठी टोल माफ करण्यात येत असल्याची घोषणा केली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. तुकाराम महाराजांची पालखी आज देहू येथून निघाली, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान शुक्रवारी आळंदी येथून होणार आहे. वारीच्या दरम्यान अनेक वाहने पंढरपूरच्या दिशेने जातात, त्या सर्व वारक-यांच्या गाड्यांना टोलमाफी देण्यात आल्याची घोषणा छगन भुजबळ यांनी केली.

Leave a Comment