नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे त्रस्त जनतेला आता पेट्रोलच्या दरवाढीचा भडका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. इराकमध्ये सुन्नी दहशतवाद्यांनी पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या भावांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे भारतातल्या पेट्रोलचे दर लीटर मागे दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुन्हा उडणार पेट्रोलचा भडका, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण
106 प्रति बॅरलच्या दराने मिळणारे कच्चे तेल, 116 डॉलरच्या घरात पोहचले आहे. त्याचबरोबर मोदींचे सरकार आल्यानंतर थांबलेली रुपयाची घसरणही पुन्हा सुरू झाली आहे. सध्या एका डॉलरचा भाव 60 रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे कच्च्या तेलावर सरकारी तेल कंपन्यांना होणारा तोटा आता प्रति लीटर तीन रुपयांच्या घरात गेला आहे.
पेट्रोलच्या दरांवर सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे येत्या काही दिवसात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले नाहीत, तर देशात पेट्रोलचे दर वाढण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.