पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत

pankaja-munde
मुंबई – विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सेनेचा वर्धापन दिन सुरू आहे तर दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठकही नुकतीच पार पडली. कोअर कमिटीतल्या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या रिकाम्या जागेवर त्यांची मुलगी पंकजा मुंडे-पालवे यांना घेण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पंकजाने खासदारकीची निवडणूक लढवून त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे या संदर्भात विनंती केंद्राकडे केल्याची माहिती दिली. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरची कोअर कमिटीची ही पहिलीच बैठक होती.

ही बैठक केंद्रीय निरीक्षक व्ही.सतीश यांच्या अध्यक्षतेखाली विनोद तावडेंच्या घरी पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थिती होते.

Leave a Comment