जगातील सर्वात मोठे 3 डी स्‍ट्रीट पेंटिंग

biggest-painting
जियांग्सू – चीनच्या जियांग्सू प्रांतातील नानजिंग शहरात जगातील आतापर्यंतचे सर्वात लांबीचे 3 डी स्ट्रीट पेटिंगचे काढण्‍यात आले आहे. पेटिंगला रिदम्स ऑफ यूथ असे नाव देण्‍यात आले आहे. 350 मीटर लांब असलेले 3 डी स्ट्रीट पेटिंग कम्युनिकेशन युनिव्हर्सिटी ऑफ चायनाच्या कॅम्पसमध्‍ये 2,500 चौरसमीटर क्षेत्रात पसरले आहे.

या आर्टवर्कने दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले आहे. पहिले सर्वात मोठी 3 डी पेटिंग आणि दुसरा सर्वात लांब स्ट्रीट आर्टवर्क. ते बनवण्‍यासाठी 3 डी पेंटिंगची’अनामॉर्फीक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात आला आहे. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्‍यांच्या संघाचे नेतृत्व प्रसिध्‍द कलाकार यांग योंगचून यांनी केले. तीव्र इच्छाशक्ती आणि बांधिलकीमुळे पेंटिंग 20 दिवसात पूर्ण झाले. यात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरूध्‍द फुलांच्या माध्‍यमातून संदेश देण्‍यात आला आहे, असे योंगचुन यांनी सांगितले.

Leave a Comment