नवी दिल्ली – महागाई कमी होणार अशी आशा वाटत असतानाच येत्या ऑक्टोंबर पर्यंत कांदा १०० रू.किलो होणार असे संकेत मिळत आहे. त्यामुळे आधीच रडविणारा कांदा आता अजून रडविणार आहे. त्यामुळे महिला दिवाळीची खरेदी म्हणून कांदा आधीच घेणार कि काय असे सूर निघत आहे.
कांदा पुन्हा रडवणार; १०० रूपये किलो होणार कांदा
कधी काळी १५ ते २० रू. किलो मिळणारा कांदा आता बाजारात २५ ते ३० वर आला आहे. मात्र पावसाने कांदयाच्या किमती एकदम आभाळाला भिडणार आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी सांगितले की, कमीत कमी एमईपी लावल्याने कांदयाचे भाव स्थिर राहू शकतात. असे केल्याने शेतकरी आणि जनता या दोघाच्याही दृष्टीने हे हितकारक राहणार आहे.