ओबामांचा सुतावा; इराक कारवाईसाठी कुणाच्याही मंजुरीची गरज नाही

baracc-obama
वॉश्गिंटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकमध्ये कोणत्याही स्वरूपाच्या कारवाईसाठी काँग्रेस सदस्यांच्या मंजुरीची गरज नसल्याचे म्हटले आहे.

सध्या इराकमध्ये इराकी सैन्य व सुन्नी कट्टरपंथी दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. दहशतवाद्यांनी इराकमधील प्रमुख शहरे तसेच काही तेल प्रकल्पांवर ताबा मिळविला असून, हे दहशतवादी राजधानी बगदादच्या जवळ पोहचले आहेत. या पार्श्वभुमीवर इराकचे पंतप्रधान नुरी मलिकी यांनी अमेरिकेकडे मदतीची याचना केली आहे. या विषयावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व संसदेच्या वरिष्ठ सदस्यांची व्हाईट हाऊसमध्ये बैठक पार पडली. इराकमध्ये दहशतवाद्यांवर हवाई हल्ले तसेच अन्य कोणत्याही स्वरूपाच्या कारवाईसाठी काँग्रेस सदस्यांच्या मंजुरीची गरज नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, सुन्नी कट्टरपंथी दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेचे विशेष लष्कर सज्ज आहे.

Leave a Comment