नवी दिल्ली – सोशल मिडीयावर भर देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे कॉंग्रेसची राजवट ‘हद्दपार’झाली आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे ,परिणामी कारभारात मोठा बदल झाला आहे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुक ,ट्विटर याद्वारे थेट जनतेच्या संपर्कात आहेत ,त्यात त्यांच्यामुळे अंतर्गत सुरक्षेचा डोलारा सांभाळणारे केंद्रीय गृह मंत्रालयही आता ट्विटरवर आले आहे .
आता ‘ट्विटर’वर केंद्रीय गृह मंत्रालय !
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्रीमंडळाला सोशलमिडीयाचा वापर करण्याचा सल्ला देताना सोशल मिडियाचे खाते उघडण्यास उद्युक्त करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्यामुळे सोशल मिडीयाचा बोलबाला सुरु झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री कार्यालयही ट्विटरवर आले आहे. गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते नव्या ट्विटर अकाऊंटचा वापर गुरुवारपासून सुरू करण्यात आला. @HMOIndia असे या अकाऊंटचे नाव आहे. गुरुवारी अकाऊंट सुरू केल्यावर सात हजारांहून अधिक जणांनी लगेचच त्याला ‘फॉलो’ करणे सुरू केले आहे .
केंद्र सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी जबाबदार सरकारच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या उद्देशाने गृह मंत्रालायने नवे ट्विटर अकाऊंट सुरू केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालय जे महत्त्वाचे निर्णय घेईल, त्याबद्दल या अकाऊंटच्या माध्यमातून थेट लोकांना माहिती देण्यात येईल, असे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना ट्विटर अकाऊंट उघडण्याचे आणि फेसबुक पेज तयार करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारमधील सर्वच मंत्रालये सोशल नेटवर्किंग साईटवर हळूहळू सक्रिय होत आहेत.