अखेर राणे अवतरले सिंधुदुर्गात

narayan-rane
कणकवली – काँग्रेसनेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे कोकणातील लोकसभा निवडणुकीत आपला मुलगा व माजी खासदार नीलेश राणे यांच्या पराभवानतर आज महिन्यानंतर सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.

राणे यांच्या या साम्राज्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने सुरुंग लावला. राणे सध्या राजकीय भूकंप घडवण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र सध्या ते आपल्या पदाधिका-याची मते अजमावत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या दौऱ्यात ते आपण कुठच्या मतदार संघातून लढणार याची गणिते मांडतील अशी शक्यता आहे. सध्या ते कुडाळ मतदार संघाचे आमदार आहेत हाच मतदार संघ ते आपल्या साठी कायम ठेवणार का? की कणकवली मतदार संघात लढणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment