बेल्जियम कडून अल्जिरिया पराभूत

aljeria

कुरितिबा: फुटबॉलच्या विश्वचषक स्पयर्धेत दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. बेल्जियमने पिछाडीवरून मुसंडी मारत अल्जिरियावर २-१ ने मात केली. मेक्सिको आणि ब्राझील यांच्यात झालेली मॅच एकही गोल न होता ड्रॉ झाली. ब्राझीलने त्यांच्या नेहमीच्या धडाक्यात मॅचला सुरुवात केली. पण मेक्सिकन गोलकिपर ओचाने ब्राझीलचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

या सामन्यात बेल्जियमने पिछाडीवरून मुसंडी मारत अल्जिरियावर २-१ मात केली. २५ व्या मिनिटाला अल्जिरियाने पेनल्टीवर गोल केला. पण बेल्जियमने सेकंड हाफमध्ये आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून मॅच २-१ ने जिंकली. रशिया आणि साऊथ कोरिया यांच्यातली मॅचही १-१ अशी बरोबरीत सुटली. फर्स्ट हाफवर वर्चस्व होते ते कोरियन्सचं पण नंतर रशियन टीम आक्रमक झाली आणि त्यांनी बरोबरी साधली.

दुसरीकडे मेक्सिको आणि ब्राझील यांच्यात झालेली मॅच एकही गोल न होता ड्रॉ झाली. ब्राझीलने त्यांच्या नेहमीच्या धडाक्यात मॅचला सुरुवात केली. पण मेक्सिकन गोलकिपर ओचाने ब्राझीलचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. न्येमारने मारलेला हेडर गोलपोस्टमध्ये जाणार असे वाटत असतानाच ओचाने उजवीकडे झेप घेत बॉल अडवला. न्येमारने गोल करण्याचे भरपूर प्रयत्न केले पण ओचाच्या चपळ गोलकिपिंगमुळे ब्राझीलला एकही गोल करता आला नाही, त्यामुळे ही मॅच ड्रॉ झाली.

Leave a Comment