टीम इंडियाने मोडले पाकचे रेकॉर्ड

teamindia

मीरपूर – टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये कमी धावा करताना जास्त धावाच्या अंतराने बांग्लादेशचा पराभव करीत यापूर्वीचे पाकिस्तानचे रेकॉर्ड मोडले आहे. या कमी धावसंख्ये‍च्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल ४७ धावांनी बांग्लादेशचा पराभव करीत मालिकेत विजय मिळविला आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या स्टुअर्ट बिन्नीने दमदार बॉलिंग करीत मॅच जिंकून दिली.

मीरपूर येथील मैदानावर बांग्लादेश विरुद्धच्या दुस-या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळे केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणा-या टीम इंडियाने बांग्लादेशला केवळ ५८ रन्सवर आऊट केले. ही कामगिरी करीत असताना टीम इंडियाने तब्बल ४७ रन्सच्या फरकाने ही मॅच जिंकली. त्या मुळे सर्वात कमी रन्स करूनही मोठ्या फरकाने विजय आपल्याच पारड्यात नोंदवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड टीम इंडियाने आपल्या नावावर केले आहे.

आत्तापर्यंत सगळ्यात कमी रन्स बनवून मॅच आपल्या घशात घालण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने १९९८९ मध्ये भारताविरुद्ध ८७ रन्स बनवून केवळ ७ रन्सने विजय मिळवला होता. २०१३ मध्ये भारतानं पोर्ट ऑफ स्पेनमध्ये श्रीलंकेविरुद्ध ११९ रन्स ठोकले होते. पण, पावसामुळे या मॅचला २९ ओव्हर्सचे करण्यात आले होते. श्रीलंका टीम ९६ रन्सवर ऑलआऊट झाली होती.

Leave a Comment