काळा पैसा ;मुदत टळूनही समितीचा अभ्यास सुरुच

black-money
नवी दिल्ली – परदेशात आणि भारतात नक्की किती काळा पैसा आहे ,याचा शोध म्हणजेच अभ्यास करण्यासाठी तीन वर्षापूर्वी नेमलेल्या समितीचा अभ्यास अजून बाकीच आहे. परिणामी समितीवर किती रक्कम खर्ची पडली हा मुद्दा आगामी काळात गाजण्याची चिन्हे आहेत.

यूपीए सरकारच्या काळात २०११मध्ये काळ्या पैशाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आला होता ,मात्र या गटाला तीन वर्षानंतरही अभ्यास पूर्ण करता आलेला नाही.

अठरा महिन्यांची मुदत देण्यात आली होती;पण मुदत संपूनही अभ्यास सुरूच आहे. माहिती अधिकारात ही माहिती देण्यात आल्याने काळ्या पैशाचा शोध अजून सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तीन वर्षांपूर्वी नेमलेल्या या समितीने तपास कामात कितपत प्रगती केलीय, याचा तपशील माहिती अधिकारात विचारण्यात आला होता . त्यावर अर्थ मंत्रालयाने तीन वर्षांपूर्वीच्या समितीचे काम अजून पूर्ण झालेले नसल्याचे उत्तर दिले आहे .

ही समिती संसदेच्या नियमानुसार गठित झाली असल्याने समितीच्या निष्कर्षांविषयी सर्वात आधी संसदेला माहिती द्यावी लागेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment