इराण-नायजेरिया सामना बरोबरीत

nayjeria

कुरितिबा – फुटबॉल वर्ल्डकपमधील’ग्रुप एफ’मधील कंटाळवाण्या लढतीमुळे इराण-नायजेरिया सामना बरोबरीत सुटला. या सामन्याात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दरम्यान या गटात या दोन संघांमध्येच दुस-या स्थानासाठी चुरस आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यात इराण अथवा नायजेरिया संघाना विजय मिळवावा लागणार आहे.

या बरोबरीत सुटलेल्या सामन्यात इराणने सुरुवातीपासून बचावात्मक पवित्रा घेतला होता. तुलनेत नायजेरियाच्या फॉरवर्डस् चांगला ताळमेळ दाखवत होते. सामन्याच्या सातव्याच मिनिटला नायजेरियाला सामन्यात आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, अहमद मुसाचा हा प्रयत्न इराणचा गोलकीपर अलिरेझा हघिघी याने हाणून पाडाला. सामना रंगू लागला तसा इराणच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दिसू लागला. इराणच्या रेझा घोचान्नेझाद याने ३४ व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला होता. नायजेरिचा गोलकीपर विनसंट इन्येमाच्या शार्प सेव्हमुळे इराणची ही संधी हुकली.

सामन्याचा उत्तरार्ध अतिशय रटाळणवाणा ठरला. दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून विस्कळीत खेळ पहायला मिळत होता. प्रेक्षकांकडूनही त्यावर खेळाडूंची हुर्रे उडविण्यात येत होती. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या संधी दवडल्या. दोन्ही गोलकीपरनादेखील फारसे प्रयत्न करून गोल अडविण्याचा प्रसंग आला नाही. ‘ग्रुप एफ’मध्ये अर्जेंटिना हा एकमेव बलाढ्य संघ आहे. त्यांनी पहिल्या साखळी सामन्यात बोस्निया- हर्झेगोविनियाचा पराभव केल्यामुळे ग्रुपमध्ये सध्या अर्जेंटिना पहिल्या स्थानावर आहे. तर, बोस्निया-हर्झेगोविनिया चौथ्या क्रमांकावर आहे. यापुढे इराण आणि नायजेरिया दोन्ही संघ बोस्नियाचा पराभव करून गटात दुसरे स्थान मिळविण्याचा प्रयत्न करतील.

Leave a Comment