इराकमधील हिंसाचाराचा भारतीयांना फटका ?

iraq
बगदाद: इराकमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत हिंसाचाराचा फटका भारतीयांना बसला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे .

मोसूल शहरात एका प्रकल्पावर काम करत असलेल्या तब्बल ४० भारतीयांचे अपहरण झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

हे सर्व भारतीय कन्स्ट्रक्शनचे काम करत होते. त्यांच्या अपहरणामागे इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनाचा हात असल्याचे म्हटले जात आहे. पण कोणत्याही कोणत्याही गटाने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. आणि अद्याप कसलीही मागणी केलेली नाही.

शिया सरकार आणि सुन्नी जिहाद्यांमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांनी भारतीयांचे अपहरण केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, या भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क न झाल्याची माहिती पराराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. सर्व नागरिकांना भारतात सुरक्षित परत आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. इराकमधील भारताचे माजी राजदूत सुरेश रेड्डी यांना चर्चेसाठी पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment