इंडोनेशिया सुपरसिरीजमध्ये सायनाची विजयी सलामी

saina-nehwal
जर्काता – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंडोनेशिया सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत बुधवारी थायलंडच्या पोर्नटिपचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. सायनाने पोर्नटिपला २१-१५, २१-१० या सरळ सेटमध्ये पराभूत केले.

थायलंडच्या खेळाडूंविरुद्ध मिळवलेला सायनाचा हा सातवा विजय आहे. पुढील सामन्यात सायनाची लढत स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमूरशी होणार आहे. सायनाने विजय मिळवला असला तरी या स्पर्धेत सुरुवातीलाच पी.व्ही. सिंधू, श्रीकांत आणि कश्यप यांना पराभव पत्करावा लागला आहे.

जागितक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या सिंधूचा चीनच्या यिहान वँगने २४-२६, १७-२१ असा पराभव केला तर पुरुष एकेरीत कश्यपला जपानच्या केनिची टॅगोकडून २१-१९, ८-२१, २२-२४ या सेटमध्ये पराभव पत्करावा लागला तर श्रीकांतला चीनच्या शेन युकेनने २१-१२, १७-२१,२१-१६ या सेटमध्ये पराभूत केले.

Leave a Comment