हजारो विद्यार्थी निकालापासून वंचित

ssc
नवी मुंबई – मंगळवारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. मात्र, सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कळालेला नाही.

मुंबई विभीगीय बोर्डाच्या दीड हजार विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाईन निकाल हाती आलेला नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

यामुळे संतप्त झालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी आज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वाशी येथील कार्यालबाहेर जमाव करत गोंधळ घातला.

Leave a Comment