‘व्हॉट्स अॅप’ महागात; आक्षेपार्ह पोस्ट ,एकाला अटक

whatsapp
औरंगाबाद – व्हॉट्स अॅपवर भावना भडकवणारा मजकूर टाकणाऱ्या एका तरुणाला वाळूज भागातून पोलिसांनी अटक केली आहे.विशेष म्हणजे वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर तो तरूण ग्रुपमधून बाहेर पडला होता.मात्र पोलिसांनी त्याला पकडले आहे.

व्हॉट्स अॅपवरील दलालवाडी येथील तरुणांच्या ‘द हिरोज ग्रुप’ या ग्रुपमध्ये हा ग्रुप तयार करणाऱ्या (ग्रुप अॅडमिन) कलीम अजिजोद्दिन शेख या तरुणाने एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. अमन ठाकूर या ग्रुपमधील सदस्याच्या मोबाइलवर देखील हा मेसेज आला होता. याप्रकरणी दिनेश बियानी या तरुणाने क्रांती चौक पोलिस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार ग्रुप अॅडमिनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार पोलिसांनी गांभीर्याने घेतला.त्याला बनावट नावाने भेटण्याचा बहाणा करीत पोलिसांनी शोध घेतला. यावेळी वाळूज एमआयडीसी भागात त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ असलेली मोबाइलचे दोन सिमकार्ड व मोबाइल पोलिसांनी तपासासाठी जप्त केला आहे.

Leave a Comment