राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता

bhaskar

भास्कर जाधव यांची उचलबांगडी

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे. या खांदेपालटात राष्ट्रवादीचे कोणते पद कोणाकडे जाते याची उत्सुकता लागली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे. सध्याच्या प्रदेशाध्यधक्षांच्या जागी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील हे याआधी २००९ मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते.

प्रदेशाध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे किंवा थेट गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या नावे आघाडीवर होती. मात्र आता आबांचीच या पदावर वर्णी लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.

Leave a Comment