बसण्याच्या जागेवरून मनसे -कॉंग्रेसमध्ये’ नळावरची भांडणे’

mase
कल्याण – पालिकेच्या सभागृहात बसण्याच्या जागेवरून मनसे आणि कॉंग्रेसच्या सदस्यांमध्ये ‘नळावर’ची भांडणे झाली.

कल्याण – डोंबिवली महानगर पालिकेच्या सभागृहात हा घडला . महानगर पालिकेची सर्वसाधारण मासिक सभा पार पडली. त्यावेळी ही भांडणे झाली मात्र त्यामागे राजकीय समीकरणेच कारणीभूत होती . मागील सभेत महापौरांनी काँग्रेसचे विश्वनाथ राणे यांची विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली होती.त्यानुसार राणे आज विरोधी पक्षनेत्याच्या जागेवर विराजमान होणार होते. मात्र, या जागेवर बसण्यावरून काँग्रेस आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला. यामुळे सभागृहात गदारोळ उडाला.मनसेने जागा सोडण्यास नकार दिला ,त्याला कॉंग्रेसनेही प्रत्युत्तर दिले.

Leave a Comment