प्रीती झिंटा प्रकरण; नेस वाडियांच्या वडिलांना धमकी

dess-wadia
मुंबई – अंडरवर्ल्डकडून प्रीती झिंटाला त्रास देऊ नका अन्यथा वाईट परिणाम होतील अशी धमकी नेस वाडिया यांचे वडिल नुस्ली वाडिया यांना आली आहे.

उदयोजक नेस वाडिया यांचे वडिल नुस्ली वाडिया यांना खंडणासाठी धमकीचे फोन येत आहेत. अशी तक्रार त्यांनी गुन्हे शाखेत नोंदवली आहे. हे धमकीचे फोन रवी पूजारी टोळीकडून येत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाडीया ग्रुपच्या ऑफीसमध्ये हा आला फोन आला होता. वाडीया यांच्या सेक्रटरींना हा फोन आला.

अभिनेत्री प्रिती झिंटाने नेस वाडिया यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. पोलिस सध्या या याचा तपास करत आहेत. असे असताना आता नेस वाडिया यांच्या वडिलांना धमकीचे फोन आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.

Leave a Comment