मुंबई – मुंबईत सुरु असलेल्या पोलिस भरतीसाठी आलेल्या आणखी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. गहिनीनाथ लटपटे असे मृत युवकचे नाव असून, तो बीड जिल्ह्यातून आला होता. शारीरीक चाचणी दरम्यान तो बेशुद्ध झाल्याने त्याला मुलुंड येथील प्लाटीनम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झला. पोलिस भरतीच्या ढिसाळ नियोजनाचा हा पाचवा बळी आहे.
पोलिस भरतीचा आणखी एक बळी
पोलिस भरती दरम्यान राहुल सकपाळ, विशाल केदार, अंबादास सोनावणे यांच्यानंतर आता गहिनीनाथ लटपटे या तरुणाचा विक्रोळी जवळील पोलीस भरती केंद्रांवर मृत्यू झाला. १४ मे रोजी गहिनीनाथ धावण्याच्या चाचणी दरम्यान चक्कर येऊन पडला. पोलिसांनी त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. परंतू, त्याची प्रकृती खालावत गेल्यामुळे त्याला दुपारी प्लाटीनम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याठिकाणी त्याला वेन्टीलेटरवर ठेवण्यात आले होते. तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर तो उपचारांना प्रतिसादही देत होता. परंतू, अचानक त्याची प्रकृती ढासळली आणि आज त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याच्या परिवाराला धक्का बसला आहे.
गहिनीनाथ याने याआधीही पोलिस भारती दिली होती. त्यामुळे या सर्व गोष्टींचा त्याला अनुभव होता. यावेळीची पोलिस भारती त्याच्या जीवावर बेतेल अस वाटल नव्हत अशी प्रतिक्रिया त्याच्या मित्रांनी दिली आहे.