कोलकाता – भारतात वाहन उद्योग क्षेत्रातील कार कंपनी फोर्ड पुढील वर्षी तीन नवीन कार दाखल करणार आहे. यामध्ये एक लहान, एक नवी एसयुव्ही कार, नवीन कॉम्पॅक्ट कारचा समावेश आहे. यामध्ये उत्कृष्ट स्टायलिंग, इंटिरिअसं आणि जास्त इक्विपमेंट असणार आहेत.
पुढील वर्षात फोर्डच्या तीन नवीन कार
मुख्य म्हणजे कंपनी आपली नवीन मॉडेल्स सर्वोत्तम इंधन क्षमतेच्या इंजीनचा वापर करणार आहे. फीगोच्या नव्या मॉडेल्समध्ये एक लिटरचे इकोबूस्ट इंजीन असणार आहे. इको स्पोर्टमध्ये या पद्धतीचे इंजीन आहे.
फोर्डची नवनी कॉम्पॅक्ट कार फीगो सेडान असणार आहे. जिच्या कॉन्सेप्ट व्हर्जनला ऑटो एक्स्पोच्या दरम्यान प्रदर्शित करण्यात आले होते.
कंपनीची नवीन एसयुव्ही कार 7 सीटर्स असणार असून ही डिझेल प्रकारात उपलब्ध होणार आहे. किमतीच्या बाबतीत ही कार टोयोटा फॉर्च्युनपेक्षा कमी असणार आहे. यामध्ये अपलिंक असणार आहे.