सचिन करणार विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा प्रचार

sachin

नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टार सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून काही दिवसापूर्वीच रिटायरमेंट घेतली असली तरी क्रिकेट त्याची पाठ सोडण्यास तयार नाही. आगामी काळात म्हणजेच२०१५ साली होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा प्रचारक म्हणून सचिन तेंडूलकर काम करणार असल्याची माहिती स्पर्धेचे ‘सीईओ’ जॉन हार्नडेन यांनी दिली.

याबाबत बोलताना स्पर्धेचे ‘सीईओ’जॉन हार्नडेन म्हणाले, टीम इंडियाचा एकेकाळचा आधारस्तंरभ असलेला सचिन तेंडुलकर विश्वरचषक स्पर्धेचा ख-या अर्थाने चाहता आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही या स्पर्धेत काही ना काही जबाबदारी सोपविणार आहोत. जबाबदारीचे स्वरूप काय असेल, हे आताच सांगणे घाईचे ठरेल. मात्र, या स्पर्धेच्या प्रचारासाठी आम्ही अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंना सहभागी करून घेण्याचा आमचा मानस आहे. त्याची जबाबदारी सचिनवर सोपविण्यात येणार आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या आयोजकांनी गेल्या आठवड्यात मुंबई व दिल्लीमध्ये रवी शास्त्री व चेतन चौहान यांच्या उपस्थितीत दोन कार्यक्रम घेतले. विश्वेचषक स्पर्धा जवळ येईल तसतशा अनेक घोषणा होतील. यंदाच्या स्पर्धेत क्रिकेटमधील स्टार मंडळींचा खुबीने वापर करण्याची आमची योजना आहे. त्यात सचिन तेंडुलकरवर फार मोठी जबाबदारी असेल, असेही जॉन हार्नडेन यांनी सांगितले.

Leave a Comment