
नवी दिल्ली – इराकमधील हिंसाचारामुळे नरेंद्र मोदी सरकारपुढील प्राधान्याचा विषय इराकमधील हिंसाचारग्रस्त तिक्रीत भागात अडकलेल्या भारतीयांची लवकरात लवकर तेथून सुटका करण्याचा आहे. केंद्र सरकार या भागात अडकलेल्या नागरिकांच्या संपर्कात असून, त्यांच्या सुटकेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
तिक्रीत अडकलेल्या नागरिकांची लवकरच सुटका
तिक्रीत भागात तब्बल ४६ परिचारिका अडकल्या असून, एका आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत केंद्र सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला आहे. या सर्व परिचारिका सुखरूप असल्याचे संबंधित संस्थेने सरकारला सांगितले. केंद्र सरकारने इराकमधील सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या इराकमधील मोहिमेचे अधिकारी यांच्याशीही संपर्क साधला आहे. त्यांनाही तिथे अडकलेल्या भारतीयांची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
