अर्जेंटिनाचा बोस्नियावर सहज विजय

fifa2

रिओ दी जानेरो: पहिल्याच विश्वचषक सामन्यात बोस्नियाच्या संघाने फुटबॉलमधील जगजेत्या अर्जेंटिनाला विजयासाठी शेवटपर्यंत चांगलेच झुंजवयाला लावले. शेवटपर्यंत रोमांचकारी ठरलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने बोस्नियावर २-१ असा विजय मिळवला. अर्जेंटिनाच्या लायनल मेसीने तब्बल आठ वर्षांनंतर फिफा विश्वचषकात गोल केला आहे.

यावेळेस पहिलाच विश्वचषक खेळत असलेल्या बोस्नियाच्या संघाने अर्जेंटिनाला विजयासाठी घाम गाळायला लावला. बोस्नियाच्या सीद कोलासिनाकने सामन्याच्या तिस-याच मिनिटाला ओन गोल केला आणि अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळाली. मात्र दुस-या गोलसाठी अर्जेंटिनाला तब्बल ६२ मिनिटे वाट पाहावी लागली. गोन्झालो ह्युग्वेनच्या पासवर मेसीने ६५ व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनाची आघाडी २-०अशी वाढवली.

तर दुसरीकडे बोसनियाच्याब वेदाद इबिसेविचने ८४ व्या मिनिटाला गोल करत बोस्नियाच्या सामन्यात परतण्याच्या आशा जाग्या केल्या. मात्र तोपर्यंत फार उशिर झाला होता. अखेर अर्जेंटिनाने २-१ असा सामना आपल्या खिशात टाकला. या स्पर्धेतील अर्जेंटीनाचा हा पहिला विजय आहे.

Leave a Comment