वॉरंटी काळात हॅंडसेट बदलून न दिल्याने ग्राहक न्यायालयात दंड

samsung
पुणे – वॉरंटीच्या काळात नादुरूस्त झालेला हॅंडसेट बदलून न देता ग्राहकाची फसवणूक करणे सॅमसंग कंपनीला महागात पडले आहे. मोबाईलची किंमत 20 हजार 800 रुपये, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी 5 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 2 हजार रुपये देण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला आहे. अध्यक्ष व्ही.पी.उत्पात, सदस्य क्षितीजा कुलकर्णी आणि मोहन पाटणकर यांनी हा आदेश दिला आहे.

याबाबत नितीन शंकर महाबळ (रा. कोथरूड) यांनी सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉ्निक्सप प्रा.लि.नवी दिल्ली, येथील वेदांत सर्व्हिसेस आणि महेंद्र इलेक्ट्रॉ निक्सह अँड इलेक्ट्रिपकल्स, एरंडवणा यांच्याविरोधात 18 डिसेंबर 2012 रोजी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. याबाबतची हकीकत अशी, महाबळ यांनी 8 मार्च 2013 रोजी महेंद्र इलेक्ट्रॉ निक्सर अँड इलेक्ट्रि्कल्स येथून 20 हजार 800 रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल विकत घेतला. काही दिवसातच तो मोबाईल सदोष असल्याचे दिसून आले. मोबाईलच्या स्टिरिओ सिस्टीममध्ये बिघाड झाला होता. हॅंडस फ्री अवस्थेत मोबाईलचा स्टिरिओ चालत नव्हता. 18 ऑगस्ट 2012 रोजी हॅंडसेट दुरूस्तीसाठी देण्यात आला. मात्र, हॅंडसेट दुरूस्त झाला नाही. त्यानंदर दोनदा हॅंडसेट दुरूस्तीसाठी देण्यात आला. तरीही हॅंडसेट दुरूस्त झाला नाही. त्यामुळे महाबळ यांनी मोबाईल बदलून देण्याची मागणी केली.

याबाबत कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही महाबळ यांनी संपर्क साधला. तरीही मोबाईल बदलून मिळाला नाही. त्यामुळे महाबळ यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. मोबाईलची किंमत 20 हजार 800, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी 25 हजार नुकसानभरपाई आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 2 हजार रुपयांची मागणी मंचात केली. नोटीस पाठवूनही वेदांत सर्व्हिसेस आणि महेंद्र इलेक्ट्रॉ निक्सर अँड इलेक्ट्रिचकल्स, एरंडवणा यांच्या वतीने कोणीही मंचात हजर राहिले नाही. तर सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉुनिक्सक प्रा.लि.नवी दिल्लीच्या वतीने मंचात तक्रारदारांचा अर्ज फेटाळण्याची मागणी करण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मोबाईल कंपनीने त्रुटीयुक्त सेवा दिली असल्याचा निष्कर्ष काढत मंचाने वरील आदेश दिला आहे.

Leave a Comment