वीज कुठे कोसळणार ,दोन तास आधी कळणार !

lighting
मुंबई – पावसाळ्यात वीज कोसळून होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानी रोखण्यासाठी आता एक यंत्रणा उभारण्यात येत आहे त्यामुळे वीज कुठे पडणार याची माहिती दोन तास आधी समजणार असल्याने दुर्दैवी घटना टाळणे शक्य होणार आहे.

परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुण्याच्या उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र विभागाच्या मदतीने अशा ‘लाईटनींग लोकेशन नेटवर्क’ची उभारणी केली आहे. या यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवित हानी टाळता येवू शकते, या यंत्रणेत एक छोटे जनीत्र असून त्यात मॉनिटरिंग आणि एक अॅन्टेनाचा समावेश आहे. हा अॅन्टेनाच्या माध्यमातून १२ मेगाहर्टस् फ्रीक्वेंसीद्वारे २०० किलोमीटर परिघात लक्ष ठेवले जाणार आहे.जेणेकरून वीज नेमकी कुठे पडेल याची माहिती दोन तास आधी समजणार आहे.त्यानंतर हि माहिती एसएमएसद्वारे संबधीत विभागाला कळवली जाणार आहे ,त्यामुळे तो भाग निर्मनुष्य करणे शक्य होणार असून जीवित हानी टाळता येईल अशी माहिती हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे .

Leave a Comment