फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी रेनाँने सोमवारी विशेष एडिशन स्काला ८ बाजारात सादर केली असून त्याच्या किमती अनुक्रमे ८,४८,००० व १०.५१ लाख रूपये अशा आहेत. रेनाँ स्काला ट्रॅव्हलॉज नावाने ही गाडी बाजारात आणली गेली आहे. दोन व्हेरिएंटमध्ये ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली असून ती मध्यम आकाराची सेदान श्रेणीतील कार आहे.
रेनाँची लिमिटेड एडीशन स्काला ८ सादर
पेट्रोल व्हर्जनच्या किमती ८ लाख ४८ हजार व १०.५१ लाख रूपये आहेत तर डिझेल व्हर्जन ९ लाख ३१ हजार व १०.२ लाख रूपयांत मिळणार आहे. या गाडीला प्रथमच टचस्क्रीन मल्टीमिडीया सिस्टीम, आवाजासह असलेले नेव्हीगेशन, रिव्हर्स कॅमेरा, डीव्हीडी प्लेअर, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी, यूएसबी पोर्ट, आयपॅड कनेक्शन अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.