राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या मंदा म्हात्रे सेनेच्या वाटेवर

manda-mahtre
मुंबई – राष्ट्रवादीत मनमानी सुरु असल्याचा आरोप करून पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी आमदार मंदा म्हात्रे आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे चित्र असून त्यांनी सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे त्यांचा सेना प्रवेश निश्चित झाला आहे.

शिवसेनेच्या प्रवक्ता निलम गोऱ्हे यांनी म्हात्रेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादीवर तोंडसुख घेताना , राष्ट्रवादीचे महिलांविषयीचे धोरण कायमच असेच पक्षपातीपणाचे राहिले आहे.

म्हात्रे माझ्या जुन्या मैत्रिण असल्याने त्यांना भेटायला आल्याचे सांगत गोऱ्हेंनी मात्र म्हात्रे सेनेत येणार की नाही यावर भाष्य टाळले तर म्हात्रे यांनी निलम गोऱ्हे यांच्या भेटीने आणि पाठींब्यामुळे नव्याने उमेद निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment