भारताचा आश्चर्यकारक विजय , मालिकाही खिशात

stuart-binny
ढाका – मीरपूरमध्ये झालेल्या दुसरया एकदिवसीय सामन्यात भारताने बांगलादेशी वाघांचा ५८ धावात फडशा पडत आश्चर्यकारकरित्या ४७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या विजयाचे शिल्पकार स्टुअर्ट बिन्नी आणि मोहीत शर्मा ठरले. बिन्नीने ४ धावाच्या मोबदल्यात 6 गडी, तर मोहीतने २२ धावाच्या मोबदल्यात ४ विकेट घेतल्या. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांची वन डे मालिका २-० ने खिशात घातली आहे.

बांग्लादेशकडून केवळ मिथून अलीने २६ तर मुशफिकर अलीने ११ धावा केल्या. अनमुल, महमदुल्ला, रहमान आणि हुसेन हे शून्यावर बाद झाले. तर तमिम ४, शाकीब ४, नासेर ५ आमि मुर्तझा २ धावांवर बाद झाले.

तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशला विजयासाठी १०६ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने सर्व बाद १०५ धावा केल्या. तस्कीन अहमद या नवोदित गोलंदाजाने अवघ्या २८ धावात ५ भारतीय फलंदाजाना माघारी पाठविले.

या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने काही काळ थांबवण्यात आलेला भारत-बांगलादेश दरम्यानचा खेळ पुन्हा सुरु करण्यात आला. नाणेफेक जिंकत बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे ४१ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Leave a Comment