दूरदर्शनवर पुन्हा सातच्या बातम्यांचे प्रसारण

dordarshan
मुंबई-मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित केल्या जाणा-या सातच्या बातम्या १८ जून २०१४पासून पुन्हा प्रसारित केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महानिदेशक मुकेश शर्मा यांनी दिली आहे.

माहिती आणि मनोरंजनाची माध्यमे मोजकी होती, त्या वेळी रेडिओबरोबरच दूरदर्शनच्या सातच्या बातम्यांना विशेष महत्त्व होते. राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींना यात महत्त्वाचे स्थान असे.

भक्ती बर्वे, स्मिता पाटील, स्मिता तळवलकर, चारुशीला पटवर्धन, अनंत भावे, प्रदीप भिडे यांच्यासारख्या दमदार निवेदकांमुळे कृष्ण-धवल टीव्ही संचावरील सातच्या बातम्या घराघरांत पोहोचल्या होत्या.

Leave a Comment