जर्मनीने उडविला पोर्तुगालचा धुव्वा

fifa१२३

रिओ दी जानेरो: फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमधील सामन्यात दिवसेंदिवस रंगत वाढत आहे. जर्मनी विरूध्द पोर्तुगाल हा सामना रंगतदार ठरेल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र ही सर्वांची अपेक्षा मात्र फोल ठरली आहे. या सामन्यात जर्मनीने पोर्तुगालचा ४-० ने धुव्वा उडवला. ही मॅच पाहण्यासाठी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल उपस्थित होत्या.

तीनदा फिफा वर्ल्ड कप जिंकणा-या जर्मनीने यावेळेसच्या वर्ल्ड कपची सुरुवात विजयाने केली आहे. या सामन्याात १२ व्या मिनिटाला थॉमस मुलरने पेनल्टी किकचा फायदा करून घेत गोल केला. तर ३२व्या मिनिटाला मॅट्स हमेल्सने एक दिमाखदार हेडर मारत गोल केला. पोर्तुगालला आणखी एक धक्का मिळाला ३८व्या मिनिटाला जेव्हा जर्मनीच्या मुल्लर आणि पोर्तुगालचा पेपे यांच्यात बाचाबाची झाली आणि पेपेला रेड कार्ड देऊन बाहेर पाठवण्यात आले. हाफटाइमच्या आधी पुन्हा एकदा मुल्लरनेच गोल नोंदवला. ७८व्या मिनिटाला आणखी एक गोल करत मुल्लरने या वर्ल्ड कपमधली पहिली हॅटट्रिक नोंदवली. या सामन्यात जर्मनीने पोर्तुगालचा ४-० ने धुव्वा उडवला.

दुसर्या् एका मॅचमध्ये अमेरिकेने बलाढ्य घानाला धक्का देत २-१ ने विजय नोंदवला.वर्ल्ड कपच्या इतिहासातला पाचवा फास्टेट गोल या मॅचमध्ये नोंदवण्यात आला.३२ व्या सेकंदाला वॉल्ट्झने अमेरिकेसाठी पहिला गोल नोंदवला पण तगडी टक्कर देत घानाने ८२ व्या मिनिटाला गोल केला आणि बरोबरी साधली. घानाचा गोल गंभीरपणे घेत फक्त पाचच मिनिटांत म्हणजे ८६व्या मिनिटाला अमेरिकेच्या जॉन ब्रुक्सने गोल केला. अनेक प्रयत्न करूनही घानाला दुसरा गोल करता आला नाही आणि अखेर अमेरिकेने बाजी मारली.

Leave a Comment