‘कॅम्पाकोला’वर २० जूननंतर हातोडा

campacola
मुंबई – वरळीतील कॅम्पाकोला सोसायटीत एका ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याने सोसायटीतील अनिधकृत फ्लॅटवर सुरु होणारी कारवाई तीन दिवस पुढे ढकलण्यात आली असली तरी आता कॅम्पाकोलावर शुक्रवारी 20 जूनपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी स्पष्ट केले आहे.

कॅम्पाकोला सोसायटीत राहणारे विनोद कोठारी यांचे रविवारी निधन झाले होते.तसेच गुरुवारी 18 जून रोजी कोठारी यांची शोकसभा होणार आहे. त्यामुळे कॅम्पाकोला सोसायटीवर होणारी कारवाई मानवतेच्या दृष्टीकोनातून 20 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली.मात्र २० जून रोजी कारवाई करताना त्याचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात येणार आहे. जेणेकरून जो कुणी अडथळा आणेल त्याच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया व्हावी या उद्देशाने चित्रीकरण होणार आहे.

20 जून रोजी महापालिका कॅम्पाकोला सोसायटीचे केवळ वीज, गॅस आणि पाणी कापेल. त्यानंतर इमारती पाडण्याचे नियोजन होणार आहे.असेही अडतानी यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment