‘एक्सप्रेस वे’ वर वाटमारी ;कुटुंबाला लुटले

mumbai-pune-highway
पुणे – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एका कुटुंबाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. कामशेत येथील ताजे पेट्रोल पंपाजवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पुण्यातील माळी कुटुंबिय थाडलंडमध्ये सुट्ट्या संपवून मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर वाहनाने पुण्याकडे येत असताना कामशेतजवळ एका फुड प्लाझाजवळ रात्री दीड वाजता थांबले , अमित माळी हे पाण्याची बाटली आणण्यासाठी खाली उतरले ,गाडीत त्यांची पत्नी रेणू आणि मुलगी वेदिका या दोघीच होत्या . त्यावेळी चार अज्ञात चोरट्यांनी रेणू यांना धमकावत गाडीच्या काचा उघडण्यास सांगितले. मात्र, त्यांनी काचा उघडण्यास नकार देत मदतीसाठी गाडीचा हॉर्न वाजविण्यास सुरूवात केली.यावेळी चोरट्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी रॉड आणि दगडाने गाडीच्या काचा फोडल्या. यानंतर गाडीतील ७५ हजार रूपयांची रोकड, पासपोर्ट आणि त्यांची बॅग घेवून पलायन केले. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत रेणू आणि त्यांची मुलगी जखमी झाली आहे.

Leave a Comment