मुंबई – वाढत्या महागाईवर आमचे लक्ष आहे. गेल्या दोन महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीचा महागाईवर परिणाम झाला आहे. त्यामुळे योग्य प्रकारे अन्न व्यवस्थापन झाल्यास खाद्यपदार्थांच्या किंमती नक्कीच कमी होतील असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी व्यक्त केला आहे .
अन्न व्यवस्थापन योग्य झाल्यास महागाईला आळा ;रघुराम राजन
इराकमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा परिणाम कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती तसेच रुपयांवर पडत आहे. घाऊक मूल्य निर्देशांकानुसार, एप्रिलमध्ये महागाईदर ५.२० टक्के तर गेल्या वर्षी मेमध्ये ४.५८ टक्क्यांवर होता. तर गेल्या डिसेंबरमध्ये ६.४ टक्के एवढा महागाई दर नोंदवला गेला होता.यापार्श्वभूमीवर राजन म्हणाले ,
वाढत्या महागाईवर आमचे लक्ष असून योग्य प्रकारे अन्न व्यवस्थापन झाल्यास नक्कीच महागाई कमी होईल असे ते म्हणाले .