अंधत्वाला दूर ठेवणारे केळे विकसित

banana
ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी सर्वसामान्यांना सहज परवडणारे फळ असलेल्या केळ्यात काही जनुकीय बदल घडवून अंधत्व दूर ठेवणार्‍या ए व्हिटॅमिनने
परिपूर्ण असलेले केळे विकसित करण्यात यश मिळविले आहे. या केळ्याच्या चाचण्या आता मानवावर सुरू होत असून त्याचे निष्कर्ष महिनाभरात हाती येणार असल्याचे सांगितले जात आहे.

या केळ्याचा उपयोग युगांडा आणि आसपासच्या मागास देशातील लक्षावधी अंध मुलांचे आंधळेपण कमी करण्यासाठी तसेच अंधत्वाला प्रतिबंध करण्यासाठीही होऊ शकणार आहे. या केळ्यात जनुकीय बदल करून बिटा कॅरोटिनची पातळी वाढविली गेली आहे. बीटा कॅरोटिनपासून ए जीवनसत्व तयार केले जाते आणि ए जीवनसत्त्व अंधत्व येऊ नये यासाठी अत्यंत आवश्यक असते.

हे केळे बाहेरून नेहमीच्या केळ्यासारखेच दिसते मात्र आतील गर पिवळसर रंगाऐवजी थोडासा लालसर असतो. याची चवही नेहमीच्या केळ्यासारखीच आहे. मानवावरील या केळ्याच्या चाचण्या यशस्वी ठरल्या तर आफ्रिकेतील कुपोषणाचे प्रमाण अधिक असलेल्या देशांत त्यांची व्यावसायिक पातळीवर लागवड केली जाणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment