हॉकीच्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

hockey

हेग – हॉकी विश्वचषकाच्या स्पर्धेत सलग दुस-यांदा जिंकण्याचा बहूमान ऑस्ट्रिलियाने मिळविला आहे.ऑस्ट्रेलियाने सांघिक कामगिरीच्या‍ जोरावर फायनलमध्ये हॉलंडचा ६-१ अशा फरकाने पराभव केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हॉकीच्या फायनलमध्ये हॉलंडला सहज नमवत विश्वलचषकावर नाव कोरले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्प‍कार ठरला तो ड्रॅग फ्लिकर क्रिस सिरिएलो. त्यााने २०व्याह, ४६व्याय, आणि ५३व्याच मिनिटाला गोल केले.त्याचबरोबर कीरण गोवर्सने २४व्या‍, ग्लेॉन टर्नरने ३६व्याआ आणि जॅमी ड्वायरने ६४ व्या मिनिटाला गोल केले. तर हॉलंडकडून जेरोनने १४व्या‍ मिनिटाला एकमात्र गोल केला.ऑस्ट्रेलियाने या सामन्यात विजय मिळवित चांगली कामगिरी केली आहे

या विजयामुळे ऑस्ट्रेलिया तीन वेळ चॅम्पियन ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग चौथ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. २००२ आणि २००६ च्या फायनलमध्ये जर्मनीसोबत पराभूत झाले होते. परंतु यावेळी त्यांनी खेळताना कसलीच चूक न करता जगज्जेता होण्याचा मान मिळविला आहे.

Leave a Comment