सॅमसंगचा स्लीम गॅलेक्सी एस टॅब्लेट सादर

samsung
दक्षिण कोरियातील बलाढ्य इलेक्ट्रोनिक कंपनी सॅमसंगने त्यांचा सर्वात स्लीम टॅब्लेट गॅलेक्सी एस नावाने अमेरिकेत सादर केला आहे. हा टॅब्लेट अवघा ६.६ मिमी जाडीचा असून त्यात प्रथमच स्मार्टफोनसाठी वापरल्या जाणार्‍या एमोलेड स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे. टॅब्लेटसारख्या आकाराने मोठ्या असलेल्या उपकरणात हा स्क्रीन वापरणे अवघड असते असे समजते.

हा टॅब्लेट दोन आकारात आहे. ८.४ इंची स्क्रीनचा टॅब्लेट १६ जीबीचा असून त्याची किंमत ३९९ डॉलर्स इतकी आहे. तर १०.५ इंची स्क्रीनचा टॅब्लेट ३२ जीबीचा असून त्याची किंमत आहे ४९९ डॉलर्स. दोन्ही टॅब्लेटसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे तसेच टॅब्लेटची एक्स्टर्नल मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढविता येते असेही कंपनीने जाहीर केले आहे.
———

Leave a Comment