राणी एलिझाबेथपेक्षा प्रिन्स विलियम्स अधिक लोकप्रिय

elizabeth
लंडन – आजी राणी एलिझाबेथ दुसरी हिच्यापेक्षा नातू प्रिन्स विलियम्स इंग्लंडमध्ये अधिक लोकप्रिय असल्याचे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. प्रिन्स विलियम्सने लोकप्रियतेत वडील प्रिन्स चार्लस आणि इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनाही मागे टाकले आहे.

३१ वर्षीय प्रिन्स विलियम्स हा वडील चार्लस यांच्यानंतर राजगादीचा दोन नंबरचा वारस आहे. सर्वेक्षणात ६८ टक्के लोकांनी त्याला पसंती दिली आहे तर राणीला ६३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. प्रिन्स चार्लस यांना ४३ टक्के तर पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांना २८ टक्के पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे इंग्लंडमधील राजकीय नेत्यांच्या तुलनेत अजूनही नागरिकांत राजघराण्यातील व्यक्ती अधिक लोकप्रिय असल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे. ११ ते १३ जून दरम्यान हे सर्वेक्षण केले गेले असल्याचे समजते.

Leave a Comment