भारतीय इंजिनिअर्सना परदेशात काम मिळणे सोपे

engineer
वॉशिंग्टन – वॉशिंग्टन करारात भारताला कायम सदयत्व मिळाल्यामुळे भारतीय इंजिनिअर्सना मोठा फायदा होणार आहे. यामुळे भारतीय इंजिनिअर्सना जागतिक मान्यता मिळेल एवढेच नव्हे तर भारतीय इंजिनिअर्सना अमेरिकेसह कोणत्याही देशात सहजतेने नोकऱया प्राप्त होणार आहेत. या समझोत्यामुळे भारत वॉशिंग्टन समझोत्यात सामील असलेल्या निवडक राष्ट्रातील 17 वा सदस्य झाला आहे.

वॉशिंग्टन समझोता हा जगातील प्रमुख राष्ट्रातील एक आंतरराष्ट्रीय करार आहे. सदर कराराप्रमाणे आंतरराष्ट्रीय मर्यादेत गुणवत्तावान इंजिनिअसच्या येण्याजाण्याबाबतच्या सुविधांची निश्चिती केली जाते. तसेच संबंधित देशांच्या इंजिनिअर्ससाठी कमीतकमी किती गुणवत्ता हे निश्चित करावे लागते. यात भारताला सामील करुन घेण्याचा निर्णय वॉशिंग्टन समझोत्यात सामील सदस्यांच्या आंतराष्ट्रीय इंजिनिअरिंग संघटनेच्या (आयईए) च्या न्युझीलंडच्या वेलिंग्टन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

भारताने इंजिनिअरिंग व अन्य तांत्रिक कार्यक्रमाला मान्यता असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडिएशन (एनबीए) च्या या समझोत्यावर हस्ताक्षर केले आहे. आयईएने एनबीएच्या मान्यता व्यवस्था व कार्यप्रणालीबाबत सखोल विचार करण्यासाठी डिसेंबर 2013-2014 च्या जानेवारी दरम्यान एक समीक्षा पथक भारतात पाठविले होते. या पथकाने आपल्या भारत दौऱयाचा अहवाल मार्च 2014 रोजी संघटनेकडे सुपूर्द केला होता. भारत 2007 पासून वॉशिंग्टन समझोत्याचा सदस्य होता व स्थायी सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नांना यामुळे यश लाभले आहे.

Leave a Comment