पहिला विंडोज फोन लाँच करणार मायक्रोमॅक्स

micromax
नवी दिल्ली – विंडोज ऑपरेटींग सिस्टीमवर आधारित आपला पहिला मोबाईल फोन भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्स आज लाँच करणार आहे.

हा नविन कॅनवास रेंज असलेला स्मार्टफोन मायक्रमॅक्स आणि मायक्रोसॉफ्ट हे आपल्या भागीदारीतून बाजारात उतरवणार आहेत.
विंडोज ८.१ ऑपरेटींग सिस्टम आधारीत असलेले दोन कॅनवास मोबाईल मायक्रोमॅक्स लाँच करत आहे. मात्र, या दोन्ही नविन मोबाईलचे स्पेसिफिकेशन मोबाईल कंपनीने अजून तरी स्पष्ट केले नाहीत. सुत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही मोबाईलची किंमत दहा हजार रुपयांपर्यत असणार आहे.

स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या स्पर्धेत मायक्रोसॉफ्ट आणि मायक्रोमॅक्स यांच्या पार्टनरशिपनमध्ये विन्डोज ८.१ ऑपरेटिंग सिस्टम असलेला मोबाईल या वर्षी बाजारात आणणार आहे. हा करार सॅन फ्रॅन्सिस्कोमधील मायक्रोसॉफ्टच्या बिल्ड संमेलनात घोषित करण्यात आला आहे.

Leave a Comment